हुक्केरी तालुक्यातील मदिहळ्ळी गावातील श्री शिवशरण हरळय्या यांचा 16 वा सप्ताहाचा कार्यक्रम पार पडला.

दोन दिवसीय साप्ताहिक कार्यक्रमात मदिहळ्ळी गावातील हरळय्या समाजाचे नेते, विविध पुजारी, भाविक, संत यांचे आगमन होऊन प्रवचन, रात्री भजन गीते व मनोरंजनाचे कार्यक्रम झाले.
दुस-या दिवशी सकाळी गावातील सुवासिनींची कलश मिरवणूक व महाप्रसाद झाला.मदिहळ्ळी गावातील हरळय्या समाजाचे नेते मारुती कांबळे, नागेंद्र कांबळे, संबाजी चांभार , चंद्र कांबळे, प्रवीण पांडव, राजू गायकवाड, संदीप कांबळे, अर्जुन पंद्रे आदी उपस्थित होते व सप्ताह यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.


Recent Comments