खानापूर तालुका आरोग्य विभागाच्या वतीने अशोकनगर येथे नेरसे ग्रामपंचायतीच्या सहकार्याने ऐच्छिक रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी 25 रक्तदात्यांनी रक्तदान करून शिबीर यशस्वी केले.

याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.महेश किवडसण्णावर यांनी शिबिरार्थींना प्रमाणपत्र देऊन मार्गदर्शन केले. .याप्रसंगी तालुका आरोग्य विभागाच्या डॉ.श्रीदेवी बोंबाटी, अशोक नगर प्राथमिक आरोग्य केंद्राचे बिराप्पा पिल्लई, सुभाष तलवार, शिवानंद बुदरकट्टी व इतर कर्मचारी उपस्थित होते.


Recent Comments