Hukkeri

दुचाकीची ट्रॅक्टरला धडक बसून १६ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

Share

हुक्केरी तालुक्यातील संकेश्वर नगर येथील चन्नम्मा सर्कलजवळ दुचाकीची ट्रॅक्टरला धडक बसून झालेल्या अपघातात संकेश्वर नगर येथील आदर्शकुमार गुप्ता या १६ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

आदर्शकुमार आपल्या बहिणीला शाळेत सोडत असताना भरधाव वेगात रस्त्याच्या कडेला असलेल्या दुभाजकाला धडकून समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरवर आदळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

हा तरुण स्थानिक एस एस पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दहावीत शिकत असल्याचे सांगण्यात येत आहे. संकेश्वरचे पोलीस निरीक्षक शिवशरण आवुजी व कर्मचारी एम.एम.जंबगी यांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Tags: