विधानसौध येथे काँग्रेस कार्यकर्त्याने पाकिस्तानच्या बाजूने घोषणा दिल्या हे काँग्रेस पक्षाला मान्य नाही. याचा अर्थ काँग्रेस पक्षाला मानमर्यादा नाही असा आरोप आ . दुर्योधन ऐहोळे यांनी केला .

बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील मीरापूरहट्टी गावात 1 कोटी 60 लाख रुपये खर्चून हायस्कूलच्या इमारतीच्या बांधकामाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.मीरापूरहट्टी गावात स्वतंत्र हायस्कूलची इमारत व्हावी, ही अनेक वर्षांपासूनची अपेक्षा होती. कंत्राटदाराने लवकर आणि उत्तम दर्जाचे कामकाज करण्याची सूचना त्याची ठेकेदाराला दिली .
विधानसौधमध्ये राज्यसभा निवडणुकीच्या निकालावेळी , काँग्रेस कार्यकर्त्याची , पाकिस्तान झिंदाबाद घोषणा दिल्या हे स्पष्ट आहे. पण काँग्रेस पक्षाला हे मान्य नाही.अशा प्रकारे काँग्रेस पक्षाला मानमर्यादा नाही, असे ते म्हणाले.
त्यानंतर माजी ग्रा.प.सदस्य पवन कत्ती म्हणाले की, आमदार दुर्योधन ऐहोळे यांच्या प्रयत्नातून मीरापूरहट्टी गावात हायस्कूलचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे.आमदार ऐहोळे हे विकास समर्थक आमदार आहेत त्यामुळे जनतेने त्यांना चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून दिले आहे. .
सुरेश बेल्लद , मारुती खोत , भीमगौडा खोत, श्रीशैल कल्लुर, रमेश किल्लारे, बाळकृष्ण खोत, तुकाराम काचीडोनी, रमेश भगवती, अजित खोत , लक्ष्मण खोत सिद्धप्पा भाटी, सदाशिव घोरपडे, सुरेशा बेल्लद , सतीश जगनौरक, आदी उपस्थित होते.


Recent Comments