Chikkodi

सीटीई संस्थेच्या इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमधील सातवीच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू

Share

चिक्कोडी शहरातील सीटीई संस्थेच्या इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमधील अनंतमूर्ती विठ्ठल बदाई (१३) या विद्यार्थ्याचा गुरुवारी अचानक मृत्यू झाला.

हुक्केरी तालुक्यातील बडकुंद्री गावातील 7 वी इयत्तेत शिकणारा अनंतमूर्ती बुधवारी दुपारपर्यंत वर्गात गेला. आजारपणामुळे दुपारी घरी गेल्याची माहिती शिक्षकाने दिली.

तीन वेळा उलट्या झाल्यानंतर मुलाची प्रकृती गंभीर बनली . त्यामुळे त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी बेळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचाराला प्रतिसाद न देता गुरुवारी या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे .

Tags: