शॉर्टसर्किटमुळे एका खासगी बसला आग लागल्याची घटना घडली आहे. मात्र चालकाच्या प्रसंगावधानाने झोपेत असलेले 35 प्रवासी आगीच्या दुघटनेतून बचावले.

हुक्केरी तालुक्यातील संकेश्वर जवळील हरगापूर येथे पुणे -बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर मुंबईहून बंगळुरूकडे जाणाऱ्या शर्मा ट्रॅव्हल्सच्या खासगी बसला पहाटे चार वाजता शॉर्ट सर्किटमुळे आग लागली.त्यावेळी चालकाने बस थांबवली आणि सर्व प्रवाशांना खाली उतरवले . सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी बचावले असून बस मात्र पूर्णपणे जळून खाक झाली.
संकेश्वरचे पोलीस निरीक्षक शिवशरण आवुजी यांचे कर्मचारी एम.एम.जांबगी व अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व आग विझवून गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.


Recent Comments