हुक्केरी तालुक्यातील शिरढाण क्रॉसजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

बेल्लद बागेवाडी गावातील अयुब इब्राहिम नेरळी हे त्यांच्या हिरो होंडा दुचाकी क्र. केए ४९ डब्ल्यू ४११७ वरून घटप्रभाकडे भरधाव वेगात येत होते . त्याच गावातील रियाज अल्ताफ फणीबंद याच्यासोबत गुडस गावातील विठ्ठल केंपण्णा बांगरी नावाचा युवक त्यांच्या बजाज पल्सरवर विरुद्ध बाजूने येत होता. KA 49 EC 0081 या दुचाकीची समोरासमोर धडक होऊन विठ्ठल यांचा अपघातस्थळी मृत्यू झाला.
हुक्केरी पोलिसांनी घटनास्थळ भेट देऊन , जखमी रियाज आणि अल्ताफ यांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल केले . आणि गुन्हा नोंदवून घेतला .


Recent Comments