अंगणवाडीतील बालके गेल्या दोन महिन्यांपासून पाण्याविना त्रस्त आहेत बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील बेळकुड गावात हा प्रकार घडला.

बेळकुड गावातील बसवनगर फार्म येथील अंगणवाडीतील बालकांची अवस्था दयनीय असून तीस हून अधिक बालकांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. अंगणवाडीतील पाण्याच्या समस्येबाबत बेळकूड ग्रामपंचायतीला विचारणा करूनही उपयोग होत नाही.
अंगणवाडी सेविकांना पाणी आणण्यासाठी दोन किलोमीटर पायपीट करावी लागते. चिमुकल्यांची पाण्यावाचून हाल होत असून कोणाला विचारणार नाही, अशी परिस्थिती आहे.
याबाबत सीडीपीओ भारती कांबळे यांना विचारणा केली असता, बेळकुड गावातील अंगणवाडीतील बालकांची पिण्याच्या पाण्याची समस्या त्यांच्या निदर्शनास आली आहे.आम्ही पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतीला पत्र दिले आहे.पिण्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कार्यवाही करू. असे सांगितले .
एकंदरीतच बेळकुड गावातील अंगणवाडीतील बालकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून त्यासाठी अधिकारी काय कारवाई करतात ते पाहावे लागेल.


Recent Comments