चिक्कोडी तालुक्यातील मांजरी गावात जमिनीचा वाद मिटवण्याच्या मागणीसाठी कुटुंबीयांनी मृतदेह समोर ठेवून आंदोलन केले .

बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील मांजरी गावात मंगळवारी पुरंदर जोगे (70) यांचा मृत्यू झाला, त्यांच्या पत्नी सुवर्णा जोगे आणि मुलगा लक्ष्मण जोगे आणि कुटुंबीयांनी आंदोलन केले.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी कि , मयत पुरंदर जोगे यांच्याकडे एकूण 11 गुंठे जमीन होती, त्यांची आर्थिक परिस्थिती खालावल्याने त्यांनी 2005 मध्ये त्या गावातील सिकंदर किल्लेदार ला 3.5 गुंठे जमीन विकली, परंतु सिकंदरने 8 गुंठे जमिनीवर अतिक्रमण केले आहे. आमची उर्वरित जमीन आम्हाला परत करावी यासाठी
सिकंदरला पुरंदर यांनी अनेकवेळा विनंती केली पण त्याचा काही उपयोग झाला नाही, त्यांनी याबाबत स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार केली आणि स्थानिक पोलिसांनी देखील प्रतिसाद न दिल्याने माझ्या पतीचा हृदयविकाराने मृत्यू झाला. असा आरोप मृताच्या पत्नीने केला .
आंदोलनाची माहिती मिळताच चिक्कोडी तहसीलदार चिदंबर कुलकर्णी आणि चिक्कोडी डीवायएसपी यांनी घटनास्थळी भेट देऊन अतिक्रमण क्षेत्राचे मोजमाप करून जागा मोकळी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.


Recent Comments