Khanapur

लेखिका शबाना अन्निगेरी यांना “कौजलगी निंगम्मा” पुरस्कार

Share

खानापूरच्या प्रसिद्ध लेखिका शबाना अन्निगेरी यांची श्री लक्कम्मादेवी कला संरक्षक संघ ब्याकूड यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या “कौजलगी निंगम्मा” पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

त्यांना अखिल रंगायण सभा भवन, धारवाड येथे आयोजित अखंड कर्नाटक चौथ्या लोकनृत्य कला मेळाव्यात या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. त्यांना यापूर्वीही अनेक पुरस्कार लाभले असून आता या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली, ही त्यांच्या चाहत्यांसाठी अभिमानाची बाब आहे.

Tags: