बैलहोंगल तालुक्यातील होसुर गावात शुक्रवारी सायंकाळी एका २५ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली.

मंजू कोलकार नामक तरुणाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. सदर व्यक्ती वककुंद गावातील असून तो मित्रासोबत त्याच्या बहिणीला औषध देण्यासाठी गेला होता. मित्रानेच हा खून केल्याचा संशय आल्याने मुरुगोड पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला . खून कोणी केला याचा शोध पोलीस घेत आहेत .


Recent Comments