बेळगाव स्मार्ट सिटीच्या एमडी आणि हुक्केरी तालुका नोडल ऑफिसर श्रीमती आफ्रिना बानू बेल्लारी म्हणाल्या की, सरकारी अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम केले तरच सरकारी प्रकल्प लोकांपर्यंत पोहोचू शकतात.

त्यांनी आज हुक्केरी शहरात विविध विभागीय अधिकाऱ्यांच्या बैठकीला संबोधित करताना सांगितले की, परीक्षेची भीती न बाळगता तालुक्यातील आगामी एसएसएलसी परीक्षेसाठी मुलांची मानसिक तयारी करणे आणि राज्यात सर्वोत्कृष्ट निकाल मिळवणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. विविध वसतिगृहातील समस्या टप्प्याटप्प्याने सोडवून शासकीय योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवाव्यात.तालुक्यातील विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपापल्या कामात समन्वय ठेवावा, असे त्या म्हणाल्या .
व्यासपीठावर तहसीलदार श्रीमती मंजुळा नायक, ईओ प्रवीण कट्टी उपस्थित होते तहसीलदार मंजुळा नायक म्हणाल्या की, लोकसभा निवडणुकीमुळे काही अधिकारी वेगवेगळ्या ठिकाणी जात असले तरी नोडल ऑफिसर बेल्लारी यांच्या आदेशानुसार चार ठिकाणी नियुक्त केलेले नवीन अधिकारीही एकत्र येऊन मॉडेल तालुका बनविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.

यावेळी बीईओ प्रभावती पाटील, समाज कल्याण अधिकारी एच.ए.माहुत, मागासवर्गीय अधिकारी महांतेश ओरवलगीन, अक्षर दसोहाच्या संचालिका सविता हलकी, सहायक संचालक कृषी नायकर, वनाधिकारी सज्जन, नगरपालिकेचे मुख्याधिकारी किशोर बेन्नी, पोलीस निरीक्षक महांतेश बसापुरे आदी उपस्थित होते.


Recent Comments