कृष्णा नदीची पाणी क्षमता 4 टीएमसी असून एप्रिल अखेरपर्यंत पाण्याची कमतरता भासणार नाही. मात्र मे महिन्यात पाण्याची समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे सर्व अधिकाऱ्यांनी सर्व बोअरवेल, विहिरी आणि कूपनलिका तत्काळ बंद कराव्यात आणि लोकांना पाण्याची समस्या उद्भवणार नाही याची काळजी घ्यावी.

पाणीप्रश्नाला सामोरे जाण्यासाठी शासनाकडे पुरेशी आर्थिक व्यवस्था आहे, पाणीपुरवठा व्यवस्थेत काही त्रुटी आढळल्यास गावातील पीडीओ, ग्राम लेखापाल व वरिष्ठांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे कागवाडचे आमदार आणि वायव्य परिवहन विभाग महामंडळाचे अध्यक्ष राजू कागे यांनी सांगितले .
शनिवारी कागवाडच्या पर्यटन मंदिरात तालुका प्रशासकीय अधिकाऱ्यांची विशेष कार्य बैठक झाली. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार राजेश बुर्ली होते. तहसीलदार राजेश बुर्ली यांनी सांगितले की, तालुका पंचायत राज्य जलविभागाचे सहाय्यक कार्यकारी अधिकारी रवी मरगाळे यांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बहुग्राम पाणीपुरवठा प्रकल्प, कूपनलिका यांची सद्यस्थिती याबाबत माहिती सांगितली आहे . चर्चेदरम्यान अधिकाऱ्यांनी पुरेशी माहिती दिली नसून सर्वांनी जबाबदारीने वागावे, असा इशारा आमदार राजू कागे यांनी अधिकाऱ्यांना दिला. जिल्हाधिकारी आणि राज्यमंत्र्यांनी यापूर्वीच सर्वांना सावध केले आहे. कागवाड मतदारसंघातील केंपवाड, नवलीहाळ, मळभावी, अनंतपूर या गावांमध्ये पाण्याची समस्या निर्माण होऊ शकते. तसेच गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न वाढत आहे. त्याआधी सर्व व्यवस्था करण्याची सूचना त्यांनी दिली .
कागवाड तालुक्यात महिला पीडीओ अधिकारी मोठ्या संख्येने कार्यरत आहेत. त्या वेळेवर गावात येत नसल्याच्या लोकांच्या तक्रारी असून, याबाबत आमदारांनी सर्व अधिकाऱ्यांना ताकीद दिली. त्यानंतर तालुका पंचायत अधिकारी प्रवीण पाटील यांनी आमदारांना याबाबत माहिती देऊन वेळेवर पंचायतीमध्ये न आल्यास त्यांचे पगार कापले जातील, असा इशारा दिला. तसेच तहसीलदार राजेश बुर्ली यांनी सर्व कर्मचाऱ्यांना येत्या उन्हाळ्याला एकत्रितपणे सामोरे जाण्यास सांगून त्यांच्या जबाबदारीची माहिती दिली.
कृषी विभागाचे अधिकारी एम.एन.कांबळे यांनी माहिती देताना सांगितले की, तालुक्यात सुमारे 51 हजार जनावरे असून त्यांच्या चाऱ्याची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. आमदारांनी बियाणे दिले तर शेतकऱ्यांनी ते बियाणे पेरले, की तुम्हाला याबाबत काही माहिती मिळाली का? असे विचारताच त्यांनी काहीच उत्तर दिले आंही .
यावेळी जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी वीरण्णा वाली, कृषी अधिकारी निंगाप्पा बिरादार, उद्यान विभागाचे अधिकारी काखमणी, तालुका पंचायत अधिकारी प्रवीण पाटील, उगार नगरपालिकेचे अधिकारी सुनील बबलादी, शेडबाळ नगरपंचायत अधिकारी एस.आर.पुजारी, ऐनापूर नगरपंचायत अधिकारी महंतेश कोल्लापुरे, सुभेदार कोल्लापुरे , कोरे आणि इतर विभागाचे अधिकारीही सहभागी झाले होते


Recent Comments