Chikkodi

आमदार प्रकाश हुक्केरी यांच्या हस्ते संतूबाई सिंचन प्रकल्पाचे उद्घाटन

Share

आ. गणेश हुक्केरी आणि विधानपरिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांच्या प्रयत्नांतून साकारलेल्या चिक्कोडी तालुक्यातील अरब्याणवाडी गावातील एक कोटी रुपये खर्चाच्या संतूबाई सिंचन प्रकल्पाचे उद्घाटन विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांच्या हस्ते करण्यात आले .

कल्लोल गावातील कृष्णानदीपासून 14 कि.मी.वर 1 कोटी रुपये खर्चून निर्माण करण्यात आलेल्या या सिंचन प्रकल्पाचे आमदार प्रकाश हुक्केरी यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले . 8 इंची 2 पाईप लाईनद्वारे पाण्याची उचल करून तेथून 5 इंची 2 लाईनद्वारे केरूर गावापर्यंत पाणी पुरवठा करण्याच्या प्रकल्पाचे उदघाटन करण्यात आले.या प्रकल्पातून 31 लाभार्थ्यांच्या 71 एकर शेतात पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. हा प्रकल्प 1 कोटी रुपये खर्चून साकारण्यात आला असून सिंचनाची सोय नव्हती. या भागातील शेतकऱ्यांनी मला सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्याची विनंती केली.त्यांच्या मागणीला प्रतिसाद देत आज आम्ही सिंचन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन पाटील, केरुर गाव पक्षाचे अध्यक्ष वीरेंद्र पाटील, पीकेपीएस अध्यक्ष बी डी पाटील, मल्लप्पा बागी, विठ्ठल वाळके , सुरेश बडकर, लघु पाटबंधारे विकासक बी.एस.लमाणी, रवी पाटील यांच्यासह सिंचन प्रकल्पाचे लाभार्थी उपस्थित होते.

Tags: