चिक्कोडी लोकसभेत भाजपमध्ये तिकीटाची लढत चुरशीची असून भाजपच्या तिकिटासाठी माजी खासदार आणि विद्यमान खासदारांमध्ये लढत सुरू झाली आहे. विद्यमान खासदार अण्णासाहेब जोल्ले आणि माजी खासदार रमेश कत्ती यांच्यात मोठी लढत झाली असून, माजी खासदार रमेश कत्ती यांना भाजपचे तिकीट द्यावे, अशी मागणी येथील भाजप कार्यकर्ते व कत्ती समर्थकांनी केली आहे.

बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी शहरात पत्रकार परिषदेत बोलताना भाजप नेते अशोक पट्टणशेट्टी यांनी भाजप हायकमांडकडे चिक्कोडी किंवा बेळगाव लोकसभेतून रमेश कत्ती यांना भाजपचे तिकीट देण्याची मागणी केली. गेल्या लोकसभा निवडणुकीत रमेश कत्ती यांचे तिकीट हुकले होते , त्यामुळे यावेळी त्यांना तिकीट द्यावे.
माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी रमेश कत्ती यांना राज्यसभा सदस्य करण्याचे आश्वासन दिले.येडियुरप्पा यांचे आश्वासन कायम आहे.रमेश कत्ती हे गेल्या अनेक वर्षांपासून पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करत असून रमेश कत्ती यांना पक्षात स्थान देण्याची मागणी त्यांच्या समर्थकांनी केली आहे.


Recent Comments