नंदगडचा चन्नवीरेश्वर रथोत्सव मोठ्या थाटात पार पडला.

नंदगड या ऐतिहासिक गावातील हलशी-खानापूर मार्गावर असलेल्या विरक्त मठात श्री चन्नवीरेश्वर जत्रा महोत्सवानिमित्त रथोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
विरक्तमठ येथून निघालेला हा रथोत्सव विविध स्वामींच्या उपस्थितीत सर्व भाविकांच्या जयघोषात अतिशय उत्साहात पार पडला. जत्रा महोत्सव तीन दिवस चालणार आहे. यावेळी रथोत्सव व महाप्रसादासह विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. भक्तांनी या जत्रा महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Recent Comments