Hukkeri

हुक्केरीत राष्ट्रीय मतदार दिन साजरा

Share

हुक्केरी चे वरिष्ठ न्यायाधीश के एस रोटेर म्हणाले की, १८ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाने मतदान करून आपला हक्क बजावला पाहिजे.
हुक्केरी येथे आज राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. तालुका कायदा सेवा समिती, वकील संघ व तालुका प्रशासन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ न्यायाधीश के.एस.रोटेर यांनी दीपप्रज्वलन करून केले.

यावेळी कनिष्ठ न्यायाधीश के अंबण्णा, तहसीलदार मंजुळा नाईक, बार असोसिएशनचे अध्यक्ष अनीस वंटमुरी , ईओ प्रवीण कट्टी, सीडीपीओ होलेप्पा एच, बीईओ प्रभावती पाटील, सरकारी वकील अनिल करोशी उपस्थित होते.
यावेळी विविध विभागाचे अधिकारी, शालेय विद्यार्थी व वकील उपस्थित होते.

Tags: