Athani

अथणीतील रडेरहट्टी सरकारी शाळेत संक्रांत साजरी

Share

संक्रांती उत्सवात पारंपारिक पदार्थ आणि आणि वेशभूषा करून , ग्रामीण परंपरेचे उदात्तीकरण करणाऱ्या सरकारी हायस्कूलच्या सर्व मुलींनी नेसलेल्या इरकल साड्या नेसून लक्ष वेधून घेतलं आहे.

हे बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील रडेरहट्टी गावात स्थित एक सरकारी माध्यमिक शाळा आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका भारती दोड्डमणी यांनी राज्यातील इतर कोणत्याही सरकारी शाळेत न झालेला उपक्रम राबवून लोकांची दाद मिळवली आहे. वैशिष्ट्य म्हणजे, नटून थटून पारंपरिक वेशात , साडी नेसून आलेल्या मुलींनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले .

सर्व मुली डोक्यावर जेवणाची टोपली घेऊन चालत असताना ग्रामीण जीवन आणि परंपरेचे वैशिष्टय आकर्षण ठळकपणे जाणवत होते .  आता त्यांनी काय स्वयंपाक बनवून आणला होता ते पाहू … आंबाड्याची भाजी , दहीभात , मक्याची रोटी, बाजरीची रोटी, नाचणीची लापशी, चटण्या , कोशिंबिरी इ.

ही शाळा इतर शाळांसाठी आदर्श आहे. काही खाजगी शाळांप्रमाणे या शाळेत कशाचीच उणीव नाही, इथले सर्व शिक्षक मुलांना प्रोत्साहन देण्यात अतिशय सक्रिय असतात आणि मुलांमधील कलागुण बाहेर आणण्यासाठी ते अखंड काम करतात.

यावेळी क्षेत्र गट संसाधन समन्वयक गौडप्पा खोत व शाळेतील शिक्षक व शिक्षिका आदींनी येऊन मुलांनी तयार केलेल्या पदार्थाचा आस्वाद घेतला.

Tags: