Khanapur

‘माडीवाला डॉक्टर’ डॉ. कुलकर्णी यांच्या जीवनचरित्राचे उद्या प्रकाशन

Share

खानापूर तालुक्यातील नंदगड येथील ‘माडीवाला डॉक्टर’ म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ. के. एस. कुलकर्णी यांच्या चरित्रात्मक पुस्तकाचा प्रकाशन समारंभ उद्या नंदगड येथे होणार असल्याचे प्रतिभा कुलकर्णी यांनी सांगितले.

खानापूर तालुक्यातील नंदगड या ऐतिहासिक गावात सरकारी डॉक्टर म्हणून आलेल्या आणि येथील सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या डॉ. के. एस. कुलकर्णी यांनी सरकारी पेशाचा राजीनामा देऊन आपले आयुष्य सर्वसामान्यांच्या सेवेसाठी वाहून घेतले. त्यांच्या जीवनसाथी प्रतिभा कुलकर्णी यांनी पुस्तक प्रकाशन सोहळ्याबाबत माहिती देताना सांगितले की, नंदगडचे, डॉ. के. एस. कुलकर्णी यांच्या निधनाला तीन वर्षे झाली आहेत. त्यांनी आयुष्यभर गोरगरीब रुग्णांची आरोग्यसेवा केली. त्यांच्या जीवनचरित्राचा माहिती देणाऱ्या आमचे आवडते “डॉक्टर कृष्णा” नावाचे पुस्तक लिहिले असून ते उद्या 13 तारखेला प्रकाशित होणार आहे. नंदगड येथील महात्मा गांधी पदवीपूर्व कॉलेजमध्ये उद्या सकाळी 11 वा. हा समारंभ होईल.

प्रतिभा कुलकर्णी यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, डॉ. के. एस. कुलकर्णी हे लहान मुलांमध्ये मूल बनत. दवाखान्यात रडत येणाऱ्या रुग्णाला हसत हसत घरी पाठवण्याचे कसब त्यांच्यात होते. त्यांनी पन्नास वर्षे डॉक्टर म्हणून सेवा केली, इथे येऊन इथले झाले, समाजातील सर्व लोकांसाठी सायकलवरून फिरले, आणि कोणताही भेदभाव न करता सर्वांना समानतेने वैद्यकीय सेवा देऊन घरचे डॉक्टर म्हणून सन्मान मिळवला. स्वामी विवेकानंदांचे ते भक्त होते.

कमळाचे फूल तलावात असते आणि पाणी त्याला स्पर्श करत नाही, तसे ते विरक्तपणे वागले. त्यांनी अनेक वर्षे एनआरइ संस्थेचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. त्यांच्यासोबत आयुष्यात घालवलेल्या क्षणांची, त्यांच्या मोठ्या कार्याची माहिती त्यांच्या जीवनचरित्रात दिली आहे. त्याचे प्रकाशन उद्या होणार आहे असे त्यांनी सांगितले.

Tags: