Hukkeri

7.14 लाख रुपयांचा अन्नभाग तांदूळ आणि ट्रक जप्त.

Share

हुक्केरी शहरात अवैध वाहतूक करण्यात येत असलेला 210 क्विंटल अन्नभाग्य तांदूळ जप्त करण्यात आला .

अन्न निरीक्षक वीरभद्र शेबान, इरफान उस्ताद, लोकेश डांगे आणि पोलिसांनी शहराच्या बाह्य भागातील एका फार्म हाऊसवर छापा टाकून 7 लाख 14 हजार रुपये किमतीचा 420 पोत्यांमधील 210 क्विंटल रेशनचा तांदूळ आणि 15 लाख रुपये किमतीचा अशोक लेलँड ट्रक जप्त केला.

रायबाग तालुक्यातील निपनाळ गावातील ट्रकचालक संतोष शिवाजी कुरणी व हुक्केरी येथील रवी शिवानंद गजबर यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Tags: