Hukkeri

हुक्केरी येथे अय्यप्पा स्वामी मालाधारींकडून इरमुडी पूजा

Share

हुक्केरी शहरातील विविध अय्यप्पा स्वामी मालाधारींनी अय्यप्पा स्वामींची विशेष महापूजा, अग्निपूजा आणि इरमुडी कार्यक्रम केला.

हुक्केरी शहरातील लक्ष्मी देवी सन्निधी आणि ओम श्री अय्यप्पा स्वामी सेवा समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात धारवाडचे रमेश स्वामी, हिरेमठाचे चंद्रशेखर महास्वामी, वीरक्त मठाचे शिवबसव स्‍वामीजी, अमरसिद्धेश्वर स्वामीजी, अंकतलागुरु महाराज, मानसिद्धगुरु महाराज यांच्या दिव्य सानिध्यात विशेष पूजा करण्यात आली.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना गुरुस्वामी सुनील भैरणावर म्हणाले की, तालुक्यातील मठाधीशांचे आशीर्वाद आणि वडिलधाऱ्यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने हुक्केरी शहरात अय्यप्पा स्वामींची सलग १८ व्या वर्षी विशेष पूजा करण्यात आली आहे.
नंतर लक्ष्मीदेवी सन्निधानातून दीपदान, इरामुडी कार्यक्रम आणि अन्नदान करण्यात आले. त्यानंतर सर्व मालाधारी सबरीमला यात्रेसाठी रवाना झाले.

यावेळी चिदानंद बस्तवाडे, बाळाप्पा बस्तवाडे, शंकर नाईक, सुधाकर शेट्टी, सुनील लाळगे, विनोद सूर्यवंशी, मारुती भजंत्री, श्रीधर गुरुस्वामी व तालुक्यातील विविध समित्यांचे मालाधारी उपस्थित होते.

Tags: