हुक्केरी शहरात उसाने भरलेला ट्रॅक्टर उलटून चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

हुक्केरी शहरातील चिक्कोडी रोडवरील रेणुकाचार्य कन्नड शाळेजवळ हा अपघात घडला . उसाने भरलेल्या ट्रॅक्टरच्या चालकाचे नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात ट्रॅक्टर पलटी झाला . हंजियानट्टी गावातील 23 वर्षीय महारुद्र केम्पण्णा संकेश्वरी या तरुणाचा या अपघातात मृत्यू झाला आहे .
हा ऊस संकेश्वर हिरा साखर कारखान्याकडे पाठवण्यात येत असल्याचे सांगण्यात येत असून हुक्केरी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन , गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.


Recent Comments