शहर अग्नीशामक ठाण्याचे अधिकारी व्ही एस टक्केकर याना जिलह अग्निशमन अधिकारीपदी बढती मिळाली असून त्यांची गदग येथे पदोन्नतीपर बदली झाली आहे .

बेळगाव तालुक्यातील कालखांबचे सुपुत्र असलेलं टक्केकर हे १९९१ साली फायरमेन म्हणून अग्निशमन दलात भरती झाले . १९९८ साली बढती मिळून ते हवालदार , २०१२ मध्ये सहाय्यक ठाणाधिकारी , तर २०१६ साली शहर ठाणाधिकारी म्हणून बढती मिळाली . त्यांनी बेलहोंगल, सवदत्ती , रामदुर्ग , संकेश्वर , सदलगा , कारवार जिल्ह्यातील
रोण आदी ठिकाणी सेवा बजावली आहे . २०१६ मध्ये त्यांनी बेळगाव शहर ठाणाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला . आता त्यांना गदग जिल्हा अग्निशमन अधिकारी म्हणून बढती मिळाली आहे


Recent Comments