सदलगा नगरपालिकेच्या 4 प्रभागांसाठी 27 डिसेंबर रोजी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल आज लागला. यामध्ये काँग्रेसचे उमेदवार 4 प्रभागात विजयी झाले आहेत.


भाजप पक्षातून काँग्रेसमध्ये गेल्याच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर कायद्याअंतर्गत त्यांना अपात्र ठरवण्यात आले होते. त्यामुळे या चार जागांसाठी २७ डिसेंबर रोजी निवडणूक झाली. प्रभाग क्रमांक 12 मधून काँग्रेसचे उमेदवार बसवराज गुंडकल्ल यांना 397 मते, प्रभाग 5 चे उमेदवार अताउल्ला मुजावर यांना 512 मते. प्रभाग क्रमांक 15 च्या उमेदवार रेहाना सनदी यांना 604 मते, प्रभाग 16 च्या उमेदवार शंकुतला कुंभार या 398 मते मिळवून विजयी झाल्या.
त्यामुळे एकूण 23 प्रभागांपैकी 12 सदस्यांचे संख्याबळ काँग्रेस गटाला मिळाले आहे. त्यामुळे सदलगा नगरपालिकेत काँग्रेस पक्ष सत्तेचे सुकाणू हाती घेणार हे निश्चित आहे. भाजप गटाकडे 11 सदस्य आहेत.
याच प्रसंगी विजयी उमेदवार बसवराज गुंडक्कल म्हणाले की, या विजयामुळे आमचे नेते विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी, आमदार गणेश हुक्केरी यांच्या विकासकामांना जनतेची साथ मिळाली आहे. त्यामुळे मी जनतेचे आभार मानू इच्छितो.
चिक्कोडी मिनीविधानसौध येथे सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी करण्यात आली . संतोष नवले, चंदा सनदी, मुन्ना पाटील, पिरागौडा पाटील, अरुण देसाई, प्रकाश अनुरे, गुलाबहुसेन बागवान, इरफान बेपारी आदी उपस्थित होते.


Recent Comments