बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील एकसंबा शहरात कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी दुकानावरील इंग्रजीतील पाट्या फोडल्याची घटना घडली आहे.

चिक्कोडी कर्नाटक रक्षण वेदिकेचे अध्यक्ष नागेश माळी यांच्या नेतृत्वाखाली कन्नड कार्यकर्त्यांनी ही मोहीम राबवली .
करवे कार्यकर्त्यांनी दुकानावर लावलेला इंग्लिश बोर्ड फाडून टाकला .
प्रत्येक दुकानात जाऊन कन्नड बोर्ड लावण्याच्या सुचना देण्यात आल्या.तसे न केल्यास दुकानाचा बोर्ड फाडून टाकू असा इशारा करवे कार्यकर्त्यांनी दिला.


Recent Comments