कर्नाटक रक्षण वेदिकेचे प्रदेशाध्यक्ष नारायण गौडा व त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर कागवाड तालुक्यातील करवे कार्यकर्त्यांनी आंदोलन करून, त्यांची लवकर सुटका करण्याची मागणी तहसीलदार राजेश बुर्ली यांच्याकडे केली.

गुरुवारी दुपारी करवे अध्यक्ष सिद्धू वोडेयर, मानद अध्यक्ष शिवानंद नविनाळ , गणेश कोळीकर, सुरेश पाटील, फारुख अलासकर आदी कार्यकर्त्यांनी तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने करत तहसीलदार राजेश बुर्ली यांना निवेदन दिले . आणि सरकारच्या या धोरणाविरुद्ध निषेध व्यक्त केला .
प्रदेशाध्यक्ष नारायण गौडा यांनी राज्याची राजधानी बेंगळुरू येथे निदर्शने केली आणि इतर भाषांमधील नावाच्या पाट्या काढून टाकण्यात आल्या आणि पोलिसांनी कारवाई करत गौडा यांना अटक केली. . आम्ही याचा निषेध करतो आणि सरकार आणि न्यायालयाला विनंती करतो की आंदोलकांची लवकरात लवकर सुटका करावी.
तसेच कागवाड तालुक्यातील सर्व गावांमध्ये 60% नावाच्या पाट्या कन्नड भाषेत लावल्या गेल्या पाहिजेत, 10 जानेवारीपर्यंत निर्णय न झाल्यास 11 जानेवारीपासून हिंसक आंदोलन करण्यात येईल आणि यासाठी राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल.
बाइट
निवेदन स्वीकारून , तहसीलदार राजेश बुर्ली यांनी त्यांच्या मागण्या शासनाच्या निदर्शनास आणून देण्याची जबाबदारी माझी असून तुमच्या मागणीला प्रतिसाद देण्यासाठी वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे सांगितले. ( )
यावेळी सचिन कुरुंदवाडे पद्मन्ना कोळी , महेश मेटीगेरे, सचिन मिरजी असे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.


Recent Comments