Chikkodi

गजानन मण्णीकेरी यांचे सेवाकाळात शिक्षण क्षेत्रात उत्तम कार्य

Share

गजानन मण्णीकेरी यांनी शिक्षण विभागात अनेक सुधारणा घडवून चांगले काम केले आहे विभागातील शिक्षक व कर्मचारी यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत..असे चरमूर्ती मठाचे संपादन स्वामीजी म्हणाले.


केशव कला भवन, चिक्कोडी येथे सहाय्यक आयुक्त धारवाड आणि जिल्हा आयुक्त तथा भारत स्काउट्स अँड गाईड्स बंगळुरूचे उपाध्यक्ष गजानन मण्णीकेरीयांच्या निवृत्तीनिमित्त आयोजित सत्कार समारंभात स्वामीजी बोलत होते . गजानन मण्णीकेरी त्यांच्याकडे शिक्षकांचा मोठा भरणा आहे.आपल्या सेवाकाळात त्यांनी , विभागात प्रामाणिकपणे काम केले . राज्यात एसएसएलसी परीक्षेत चिक्कोडीने पुन्हा एकदा चांगली कामगिरी करावी, असे ते म्हणाले. .

सेवेतून निवृत्त झालेले गजानन मण्णीकेरी यांनी आपल्या बालपणात घालवलेल्या गरिबीबद्दल सांगितले.शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मी एवढा मोठा होण्याचे कारण म्हणजे लोकांचे प्रेम आणि विश्वास.
ते म्हणाले की, विभागातील उत्तम कामगिरी करण्यासाठी मी 37 वर्षे, शिक्षक व विभागातील कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने सेवा केली आहे.शिक्षक म्हणून शिकवले ते दिवस मला सर्वात जास्त आनंद देणारे होते.मी कामगिरी बजावली याचे मला समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले डीडीपीआय मोहन हंचाटे म्हणाले की, चिक्कोडी शिक्षण जिल्ह्यातील प्रत्येक शाळेला अग्रेसर करण्याचे काम , गजानन मण्णीकेरी यांनी केले आहे. आपली सेवाकाळात काळात अनेक अडचणींवर मत करून त्यांनी चांगले काम केले आहे.

अंकलगी स्वामीजी समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते.सुनंदा गजानन मण्णीकेरी, बी ए मेकनमर्डी , बीईओ प्रभावती पाटील, महादेवी नायक, अनिलकुमार गंगाधर, एम.आर.मुंजे, अजित मन्निकेरी, जी.बी. बळीगार, राजेंद्र तेरदाळ श्रवण मण्णीकेरी, अनुश्री श्रवण मण्णीकेरी , नागराज घोळेपनवर, सोमेश शेडबाळे, प्रकाश हिरेमठ, रेवती मठद , जे.एम. हिरेमठ, बी.ए. कुंभार, एस.बी.शिंगे, बी.ए.सोल्लापुर, गोविंद सनक्की, एन.जी.पाटील, शिक्षक जी.एम.कांबळे, एस.एन.बेळगावी , चंद्रशेखर अरबी, वाय.एस.बुड्डागोळ , उपस्थित होते.

Tags: