कोरोना विषाणूचा लोकांना विसर पडेपर्यंत पुन्हा नव्या जेएन १ या कोरोनाच्या नवीन व्हायरसच्या संसर्गाला सुरुवात झाली आहे.त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. चला तर मग पाहूया हुक्केरीतील कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी केलेल्या खबरदारीबाबत आमचे प्रतिनिधी राजू बागलकोटी यांनी दिलेला एक रिपोर्ट…


शेजारील राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे सीमावर्ती गावांमध्ये पुन्हा कोरोनाची भीती निर्माण झाली आहे. हे लक्षात घेऊन आरोग्य विभागाचे अधिकारी कोरोना लाटेला तोंड देण्यासाठी सज्ज झाले आहेत. हुक्केरी तालुका रुग्णालयात पूर्व तयारी करून कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे.
याबाबत इन न्यूजशी बोलताना हुक्केरी तालुका रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी एम.एम. नरसन्नवर यांनी सांगितले कि , कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटवर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुका रुग्णालयांमध्ये आधीच बेड्स आरक्षित करण्यात आल्या आहेत, बेड्ससाठी ऑक्सिजन यंत्रणेसह सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. कोरोना विषाणूचा आणखी प्रसार होण्याची शक्यता असल्याने डॉक्टरांनी जनतेला तातडीने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
एकूणच, कोरोना साथीच्या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. रुग्णांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे यावेळी कोरोना महामारीचा त्रास होऊ नये हीच लोकांची प्रार्थना आहे.


Recent Comments