कर्नाटक राज्य विणकर सेवा संघाच्या वतीने विद्युत यंत्रमागधारकांची वीज बंद करणाऱ्या हेस्कॉम अधिकाऱ्यांच्या कारवाईचा निषेध , करून विणकरांचे थकीत वीज बिल शासनाने भरावे तसेच विणकरांना बांधकाम कामगारांप्रमाणे सुविधा द्याव्यात , या मागणीसाठी तालुक्यातील विविध गावातील विणकरांनी आंदोलन केले. मिनीविधान सौध समोर आंदोलन करून उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन दिले.

20/HP साठी वीज जोडणी असलेल्या विणकरांना 500 युनिट मोफत तसेच 500 युनिटच्या अतिरिक्त वापरासाठी , प्रति युनिटसाठी 1.25 रुपये प्रमाणे , इतर कोणतेही शुल्क न आकारता वीज देण्याची मागणी त्यांनी केली. तामिळनाडू सरकारने विणकरांना कपडे पुरवठा करण्यासाठी एक योजना लागू केली आहे. हातमाग विणकरांनी तिथल्या सरकारी विभागांकडे जाऊन राज्य सरकारला त्या मॉडेलवर योजना तयार करण्याची विनंती केली.
राज्यातील 47 विणकरांनी कर्जाच्या ओझ्याला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत . त्या कुटुंबांना 10 लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी.व्यावसायिक विणकरांची 5-6 महिन्यांची थकबाकी सरकारने भरावी , अशी मागणी त्यांनी केली. राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्ज माफ करण्याची मागणी सहकारी संस्थांनी सरकारकडे केली.
यावेळी कर्नाटक राज्य विणकर सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष शिवलिंग तिरकी, युवराज मोरे, अर्जुन कुंभार , इरागोंडा जिगरे, संदीप माने, बालाजी माने, प्रल्हाद डोणवाडे, सोमनाथ परकाळे, आण्णासो नगराळे, भीमराव खोत , राजेंद्र बेन्नाडे, महावीर धरंगुटे, लक्ष्मण कांबळे, बालाजी माने लक्ष्मणराव वाडे, राजू कांबळे, अण्णासाहेब वरुटे आदी सहभागी झाले होते.


Recent Comments