चिक्कोडीच्या बसवेश्वर नगरात भरदिवसा घराचा मागील दरवाजा तोडून 35 तोळे सोने चोरून नेल्याची घटना घडली.

पाटबंधारे विभागाचे निवृत्त अभियंता बी.डी. नसलापुरे यांच्या घराचा दरवाजा तोडून , घरातील सोन्याचे दागिने चोरून दरोडेखोरांनी पळ काढला. घरमालक आपल्या कुटुंबासह शमनेवाडी या मूळ गावी गेले असता ही घटना घडली. शेजारच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरट्यांची माहिती कैद झाली आहे. चोरटे जॅकेट घालून आले होते, असे घरमालक बी.डी. नसलापुरे यांनी माध्यमांना माहिती दिली.
सीपीआय विश्वनाथ चौगला, पीएसआय बसनगौडा यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. श्वान पथक व बोटांचे ठसे तज्ज्ञांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चिक्कोडी येथील हरिनगरमध्ये अवघ्या तीन दिवसांपूर्वीच घरफोडी झाली होती . आता दिवसाढवळ्या चोरटयांनी मोठ्या प्रमाणात सोने चोरून पळ काढला आहे.


Recent Comments