बेळगावचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक एम वेणुगोपाल यांच्या नेतृत्वाखाली हुक्केरी शहरात गुन्हेगारी प्रतिबंध, अंमली पदार्थ विरोधी आणि वाहतूक नियम या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली.


बेळगावचे , अतिरिक्त पोलीस अधीक्षक, एम वेणुगोपाल, यांनी शहरातील महावीर पदवीपूर्व कॉलेजमध्ये कार्यशाळा घेतली व विद्यार्थ्यांना संबोधित केले. विद्यार्थ्यांनी वाहतुकीचे नियम पाळावेत आणि इतरांनाही माहिती द्यावी आणि अमली पदार्थ व गुन्हे आढळून आल्यास त्याची तक्रार जवळच्या पोलीस ठाण्यात करावी .गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सहकार्य करावे, यासाठी त्यांनी जनजागृती करण्याचा सल्ला दिला.
महावीर शिक्षण संस्थेचे प्राचार्य महावीर निलजगी यांनी अधिकाऱ्यांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. व्यासपीठावर संघटनेचे उपाध्यक्ष प्रज्वल निलजगी, हुक्केरीचे पोलीस निरीक्षक महांतेश बसापुरे, पीएसआय अभिजित उपस्थित होते.
यावेळी पोलीस कर्मचारी मंजुनाथ कब्बूर , हणमंत खोत , प्राचार्य व्ही.पी.कम्मार , महावीर शिक्षण संस्थेचे कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.


Recent Comments