चिक्कोडी मार्गावर पट्टणकुडीजवळ दुचाकी आणि कार यांच्यात झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला.

या अपघातात दुचाकीस्वार चंद्रप्पा जी. पुजारी (३६) यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.मृत चंद्रप्पा पुजारी हे मध्यरात्री निप्पाणीहून चिक्कोडीकडे जात होते. दरम्यान, चिक्कोडी रस्त्यावरील पट्टणकुडीजवळ निप्पाणी-मुधोळ रस्त्यावर दुचाकी आणि कारची धडक झाली. चंद्रप्पा गंभीर जखमी झाला.
जखमी चंद्रप्पाला रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.याप्रकरणी खडकलाट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Recent Comments