अथणी तालुक्यातील कर्लट्टीजवळ , थांबलेल्या दुचाकीस्वाराला अज्ञात वाहनाने ठोकरले . अपघात घडताच वाहनचालक वाहनसहित पसार झाला
आहे .

अथणी तालुक्यातील कर्लट्टीजवळ हा अपघात झाला असून दुचाकीस्वाराची प्रकृती चिंताजनक आहे. रस्त्याच्या कडेला दुचाकी घेऊन उभ्या असलेल्या मुरगुंडी गावातील महाबल यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले .
अपघातानंतर , धडक दिलेल्या वाहनासहित वाहनचालक पळून गेला . .जखमी महाबल यांना तालुका रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ही घटना अथणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.


Recent Comments