बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील शेगुणसी गावात खासगी शाळेची विध्यार्थी वाहतुकीची बस उलटली. सुदैवानेच या दुर्घटनेत जीव हानी झाली नाही.

आज सकाळी मुलांना शाळेत आणत असताना एक दुर्घटना घडली. 10 विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या शालेय बसचा ग्रामीण मार्गावर अपघात झाला. समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात स्कूल बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पडली. स्थानिक नागरिकांच्या वेळीच प्रयत्नांमुळे बसमधील मुले आणि चालकाला वाचवण्यात यश आले.


Recent Comments