Hukkeri

स्वयंभू करेम्मा देवीचा 18 वा कार्तिकोत्सव सोहळा.

Share

हुक्केरी नगरीतील श्री करेम्मा देवी, श्री दुर्गापरमेश्वरी आणि अष्टविनायक मंदिराचा कार्तिक महिन्याचा कार्तिकोत्सव साजरा करण्यात आला ,

दरवर्षी कार्तिक महिन्यात, शहरातील स्वामी विवेकानंद आणि जयनगर भागातील करेम्मा देवी, दुर्गापरमेश्वरी आणि अष्टविनायक मंदिरांमध्ये कार्तिकोत्सव आयोजित केला जातो.
सकाळी महिला आणि लहान मुले देवीची प्रार्थना करण्यासाठी मंदिरात गेली.

त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना गीता सुभाष बस्तवाड यांनी सांगितले कि , करेम्मा देवी मंदिराचा अनेक वर्षांचा इतिहास आहे, आता ते प्रसिद्ध आहे. जयनगर आणि स्वामी विवेकानंद नगर येथील लोक दरवर्षी कार्तिक दीपोत्सव करून येथील मंदिरांमध्ये जत्रा भरवतात .

यावेळी दिव्या निरंजन हिरेमठ,कलावती शिवप्रसाद कुंभार,शिला शिवाप्पा कोरी, शीला शेखर मरसनवर, बी.डी.देसाई, शिवाप्पा बी. कोरी, अण्णाप्पा कमते, चंदू लट्टी, केम्पण्णा कुगटोली,
सुभाष बस्तवाड आदी उपस्थित होते. सायंकाळी कार्तिक दीपोत्सव साजरा करण्यात आला.

Tags: