Kagawad

शहाजी महाराजांच्या समाधीची दुरावस्था : समाधीचा विकास करण्याची मागणी

Share

चिक्कोडी जिल्हा शिवसेना पक्षाध्यक्ष दादासाहेब पाटील यांनी कर्नाटक भाजपा प्रदेशाध्यक्ष बी.वाय विजयेंद्र निवेदन. यांना दिले.

बेळगावात मंगळवारी झालेल्या सुवर्ण विधानसभेच्या अधिवेशनासाठी बी.वाय.विजयेंद्र आले होते त्यावेळी त्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले . कागवड तालुक्यातील उगार गावचे दादासाहेब पाटील हे चिक्कोडी जिल्ह्याचे शिवसेना अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. राज्यातील दावणगेरे जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शिहाजी राजे यांच्या निधनानंतर, अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या समाधी स्थळाची दुरावस्था झाली आहे . बीएस येडियुरप्पा मुख्यमंत्री असताना 2018 पासून मी सतत प्रयत्न करत आहे. मात्र, सरकार लक्ष देत नसल्याने मी भाजपचे प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र यांना निवेदन देऊन समस्यांची माहिती दिली आहे.

दावणगेरे जिल्ह्यातील शहाजी महाराजांची समाधी भारतीय पुरातत्व विभागाच्या अंतर्गत येते. ही बाब देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या निदर्शनास आणून देऊन हिंदुस्थानच्या जनतेचे हृदय असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे यांच्या समाधीची स्थिती सुधारावी, अशी विनंती केल्याचे दादासाहेब पाटील कागवाडमध्ये म्हणाले.

राज्यातील भाजप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बी.वाय.विजयेंद्र यांनी हे निवेदन स्वीकारले . आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या निदर्शनास हा मुद्दे आणून देऊ , आणि लाखो लोकांची मागणी पूर्ण करू असे आश्वासन दिले.

यावेळी , श्रीमती रुपाली पाटील, संतोमी पाटील यांच्यासह अनेक लोक उपस्थित होते.

Tags: