हुक्केरी नगर येथील स्वामी अयप्पा सेवा समितीचे गुरुस्वामी वीरेंद्र चौगला यांनी हुक्केरी शहरामध्ये अयप्पा स्वामी सन्निधानाच्या उभारणीसाठी मोहीम राबवून आज पदयात्रा काढली.

माध्यमांशी बोलताना वकील प्रकाश पाटील म्हणाले की, वीरेंद्र चौगला हे गेल्या १० वर्षांपासून अयप्पा स्वामींची मालाधारी म्हणून सेवा करत आहेत.गेल्या वर्षी त्यांनी शबरी मलय स्वामींच्या सन्निधानात १५ दिवस सेवा केली होती. त्यांची आज शबरी मलयला हुक्केरी सेवा समितीच्यावतीने , पाठवणी करीत आहोत .
गुरू स्वामी वीरेंद्र म्हणाले की हुक्केरी नगरीत स्वामींचे सन्निधान बांधले जावे व या दुष्काळात वेळोवेळी पाऊस पडावा व शेतकऱ्यांचे जीवन सुखकर व्हावे. यासाठी ही प्रार्थना करीत आहेत .
अय्यप्पा स्वामी सेवा समिती सदस्यांनीजल्लोष करीत त्यांना शुभेच्छा दिल्या . या वेळी चिदानंद बस्तवाडे, कुमार शिंदे, राजू माने, चिदानंद बरगाळी, गणेश माने, सोमू मुदकन्नवर, आनंद बामणे आदी उपस्थित होते.


Recent Comments