कर्नाटक भाजपचे अध्यक्ष आमदार बी. वाय. विजयेंद्र यांनी बेळगाव शहरातील हुक्केरी हिरेमठ शाखेत जाऊन चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी चंद्रशेखर शिवाचार्य श्रींच्या हस्ते विजयेंद्र यांचा सत्कार करण्यात आला.

कर्नाटक भाजपचे अध्यक्ष झाल्यानंतर अधिवेशनासाठी प्रथमच बेळगावात आलेल्या आमदार बीवाय विजयेंद्र यांनी बेळगाव लक्ष्मीटेकडी येथील हुक्केरी हिरेमठ येथे जाऊन चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांचे आशीर्वाद घेतले.
यावेळी बोलताना, बी. वाय. विजयेंद्र यांनी सांगितले की, हुक्केरी हिरेमठच्या दसरा उत्सवात आल्यावर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्ही बेळगावला याल असा आशीर्वाद दिला होता. त्यामुळे आज मी भाजप पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आहे. सर्वांचे आशीर्वाद मला आहेत. कारंजीमठाचे गुरुसिद्ध स्वामीजींच्या आशीर्वादाचे त्यांनी स्मरण केले.
यावेळी माजी विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, भाजप राज्य प्रवक्ता एम. बी. जिरली, मुक्तार हुसेन पठाण, निवृत्त प्रादेशिक आयुक्त महांतेश हिरेमठ, महांतेश वकुंद, वीरेश किवडसन्नवर, विरुपाक्षय्या निरलगीमठ, चंद्रशेखरय्या सवदी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments