बेळगावात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज विविध मागण्यांच्या पूर्ततेचा आग्रह धरत माध्यान्ह आहार अक्षर दासोह कर्मचारी संघटनेने सुवर्णसौधसमोर निदर्शने केली. परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी आंदोलकांची भेट घेऊन निवेदन स्वीकारून मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी बोलताना मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी अक्षर दासोह मजदूर संघातर्फे विविध अनुदानित व सरकारी शाळांमध्ये माध्यान्ह आहार बनवण्याचे काम केले जात आहे. 2005 मध्ये मी शिक्षण मंत्री होतो, त्यापूर्वी एसएएम कृष्णा असताना माध्यान्ह आहारयोजना सुरू झाली, सिद्धरामय्या यांच्याआधी फक्त प्राथमिक पातळीवर सुरू झाली. सिद्धरामय्या मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी इयत्ता सहावी, सातवीपर्यंत तिचा विस्तार केला. त्यानंतर हायस्कूलसाठी योजना राबविण्यास प्रारंभ झाला. त्यावेळी पगार 2600 रुपये ठरला होता, तो आता 3600 रुपये आहे. याबाबतची तुमची मागणी मी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालेन आणि न्याय मिळवून देईन असे आश्वासन त्यांनी दिले.
मंत्री रेड्डी यांच्यापुढे कैफियत मांडताना गंगाधर बडिगेर म्हणाले की, अक्षर दासोह संघाचे कर्मचारी प्रामाणिकपणे नियमित काम करत आहेत, मात्र आम्हाला किमान वेतन मिळत नाही. या कामगारांना किमान वेतन कायद्यांतर्गत आणून आमचे जीवन चांगले करण्यासाठी शासनाने सहकार्य करावे. बाइट
भावना बेळ्ळारी यांनी सांगितले की, आज आम्ही कर्नाटक राज्य संयुक्त अक्षरा दासोह मजदूर संघाचे कार्यकर्ते आंदोलन करत आहोत, आम्ही जवळपास वीस वर्षे काम करत आहोत, आजपर्यंत आम्हाला ओळखपत्र, गणवेश, काहीही दिले गेले नाही, वसतिगृहातील स्वयंपाकींना सर्व प्रकारच्या सुविधा आहेत. मात्र आम्हाला कोणत्याही सुविधा नाहीत, किमान वेतनही नाही. आम्हाला पीएफ, इएसआय दिला पाहिजे. यासाठी आम्ही मंत्र्यांची भेट घेतली आहे. आम्हाला त्वरित न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.
निदर्शन स्थळी पोहोचलेले मंत्री रामलिंगा रेड्डी लवकरात लवकर त्यांचे वचन पूर्ण करतील आणि अक्षर दासोह कर्मचाऱ्यांना दिलासा मिळवून देतील मदतीसाठी उभे राहतील अशी ‘इन न्यूज’ला आशा


Recent Comments