हुक्केरी तालुका हालूमत समाजाचे अध्यक्ष डॉ.जयप्रकाश करजगी म्हणाले की, भक्त कनकदास यांनी कवितेतून समतेचा प्रसार करण्याचा इतिहास निर्माण केला आहे.


हुक्केरी तालुका प्रशासन व हालूमत समाजाच्या वतीने संतश्रेष्ठ भक्त कनकदास यांची 536 वी जयंती वीरक्त मठाचे शिव बसव महास्वामी यांच्या दिव्य उपस्थितीत साजरी करण्यात आली.
त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना तालुका हालूमत समाजाचे अध्यक्ष डॉ.जयप्रकाश करजगी म्हणाले की, आजच्या तरुण पिढीला संतांच्या आदर्शाची ओळख व्हावी या उद्देशाने महाकवी संत कनकदास यांची जयंती साजरी करणे गरजेचे आहे.असे ते म्हणाले .
यावेळी मेंढ्याच्या गाडीतून संत कनकदास यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली .
तहसीलदार मंजुळा नायक म्हणाल्या की, 16व्या शतकातील संत कनकदास हे सर्वांना एक वाटणारे महान कवी होते.त्यांची जयंती आज हुक्केरी तालुक्यातील हालुमत समाजाच्या सदस्यांसोबत सार्थकतेने साजरी करण्यात आली.
यावेळी हालुमत समाजाचे नेते सत्यप्पा चंद्रगी, शंकर केरीमनी, सिद्दू धवलेश्वर, भरमा पुजेरी, शंकरराव हेगडे, गजानन कोल्ली, अशोक दुम्मगोल, हालू गडदवर, भिरू खुबनगोळ, विजय गावडे, सिध्दगौडा हेगडे, समाजाचे विविध कार्यकर्ते , नेते व विभागीय अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments