कर्नाटकात कन्नड शाळेच्या बांधकामाला मराठी शाळेच्या एसडीएमसी सदस्यांनी विरोध दर्शवल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील निप्पाणी तालुक्यातील कारदगा गावात घडली.

आज एसडीएमसी सदस्यांनी कन्नड शाळेच्या खोलीचे बांधकाम पुढे केले.यावेळी सरकारी मराठी शाळेच्या एसडीएमसी सदस्यांनी आपला विरोध व्यक्त केला. कारदगा गावात सर्व्हे क्रमांक 462 मध्ये कन्नड आणि मराठी शाळांसाठी जागा आरक्षित करण्यात आली होती. त्याच ठिकाणी आम्ही कन्नड शाळेची खोली बांधू, अशी प्रतिक्रिया SDMC अध्यक्ष अण्णाप्पा मुळवाडे यांनी माध्यमांना दिली.
अनेक दिवसांपासून कन्नड शाळेतील मुलांची पटसंख्या कमी झाल्यामुळे ही वर्गखोली कारदगा गावातील जुन्या शासकीय मराठी शाळेच्या इमारतीत हलविण्यात आली.मुलांची पटसंख्या वाढल्यामुळे पूर्वीच्या आरक्षित जागेवर शाळेला खोली बांधण्यासाठी निवेदन देण्यात आले. .
एकंदर मराठी असो व कन्नड , विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या दृष्टीने भाषावाद करणे चुकीचे आहे .


Recent Comments