बैलहोंगल उपविभागीय कार्यालयातील एसडीसी मंजुनाथ अंगडी याना 60 हजारांची लाच घेताना लोकायुक्तानी रंगेहाथ पकडले .

मंजुनाथने पहाणी पत्रात दुरुस्ती करण्यासाठी 60 हजारांची लाच मागितली होती. रामदुर्ग तालुक्यातील चिकोप्प एस के गावातील रवी अज्जी यांनी पाहणी पत्रात दुरुस्तीसाठी अर्ज केला होता. पहाणी पत्रात दुरुस्ती करण्यासाठी मंजुनाथने 60 हजारांची लाच मागितली होती.
याप्रकरणी रवी अज्जी यांनी बेळगाव लोकायुक्त ठाण्यात तक्रार केली होती. लोकायुक्त एसपी मनमंतय्या , डीवायएसपी बी.एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अन्नपूर्णा हुलगुर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सापळा रचून ही कारवाई केली .


Recent Comments