Belagavi

निःपक्ष तपास न केल्यास पोलीस आयुक्तांच्या चौकशीची मागणी : अभय पाटील

Share

नगरसेवक अभिजित जवळकर अटकेप्रकरणी आयुक्तांनी निष्पक्ष तपास करण्याचे आदेश द्यावेत अन्यथा, त्यांच्या विरोधात चौकशीची मागणी करू, असा इशारा आमदार अभय पाटील यांनी दिला आहे.

याबाबत आमदार अभय पाटील यांनी व्हिडीओ निवेदन जारी करून म्हटले आहे की, टिळकवाडी पोलिसांनी नगरसेवक जवळकर यांना बेकायदा अटक केली आहे. आज रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्वत: आयुक्तांना पत्र लिहिले आहे. पोलीस अधिकारी व त्यांच्या सोबतच्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यासाठी हा एकच साक्षीदार पुरेसा आहे, असे आयुक्तांनी सांगितले. टिळकवाडी सीपीआय आणि पोलिसांचे निलंबन करण्यासाठी पोलीस आयुक्त कोणत्या राजकीय दबावामुळे कचरत आहेत हे समजत नाही.

पोलीस आयुक्तांनी निष्पक्ष तपास केला नाही, तर त्यांच्यावर संशय व्यक्त होईल. पोलीस आयुक्तांनी राजकीय दबाव न जुमानता कारवाई केली पाहिजे. अन्यथा त्यांच्या विरोधात पुढे कसा लढा द्यायचा याचा निर्णय उद्या होणाऱ्या महापालिका बैठकीत घेण्यात येणार आहे. जवळकर रुग्णालयात दाखल झाल्यापासून त्यांना डिस्चार्ज मिळेपर्यंतचे सर्व व्हीडीओ फुटेज आमच्या कार्यकर्त्यांनी गोळा केले असून, टिळकवाडी पोलिसांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना धमक्या देणे बंद करावे, असे आ. अभय पाटील म्हणाले

Tags: