चालत्या बसमधून विद्यार्थिनी खाली पडून डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडीतील आंबेडकर सर्कलजवळ घडली आहे .

ही घटना चिक्कोडी मिरज राज्य महामार्गावर घडली.रायबाग येथून चिक्कोडी येथे येत असताना नंदीकुरळी गावातील संजना दत्तवाडे (17) ही विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली आहे.विद्यार्थीनी बसमधून खाली पडल्याचे दृश्य सीसी कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
विद्यार्थिनीवर चिक्कोडी तालुका रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले , डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिला बेळगाव जिल्हा रुग्णालयात अधिक उपचारासाठी पाठवण्यात आले. ही घटना चिक्कोडी वाहतूक पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली


Recent Comments