कागवाड तालुक्यातील शिरगुप्पी गावातून संविधान जागृती रॅली 26 नोव्हेंबर रोजी सुरू होऊन , त्या दिवशी सायंकाळपर्यंत सुमारे 70 किमीचा प्रवास करून , अनंतपुर मध्ये ह्या रॅलीची सांगता होईल अशी माहिती . ज्येष्ठ दलित नेते संजय तळवलकर म्हणाले .

गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना दलित नेते संजय तळवलकर म्हणाले कि , , राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. आंबेडकर समाजात समानतेसाठी लढा दिला आणि संविधानाची रचना केली. संविधानाने आम्हा भारतीयांना समान अधिकार दिले आहेत, मात्र अलीकडच्या काळात संविधानाचे विकृतीकरण करण्याचे काम सुरू असून, याबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी राज्याच्या विविध भागात या जागृती रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. यंदा प्रथमच बेळगाव जिल्ह्यात होत आहे.
तालुक्यातील शिरगुप्पी येथील करुणा बुद्ध विहारातून 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता जिल्ह्याचे प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी, कागवाडचे आमदार राजू कागे, अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी, माजी आमदार श्याम घाटगे, काँग्रेस नेते रमेश घाटगे, रावसाहेब ऐहोळे आदींच्या उपस्थितीत या जागृती रॅलीचा शुभारंभ होणार आहे. कागवाड, शेडबाळ, उगार, मंगसुळी , ऐनापुर, मोळे, मदभावी मार्गे जाऊन सायंकाळी अनंतपूर येथे सांगता होईल. अशी माहिती त्यांनी दिली .
या वेळी दलित नेते बाळकृष्ण बजंत्री, विद्याधर मौर्य, प्रकाश धोंडरे, सचिन पुजारी, विजय असोदे, यशवंत कांबळे, हणमंत मधाळे , रवी कुरणे, सुनीला मदभावी, व्यंकटेश कांबळे, बापू धोंडरे, विशाल धोंडरे, बाळू कांबळे, आदी उपस्थित होते. रमेश कांबळे, शंकर निडोणी, विजय बजंत्री आदी उपस्थित होते.


Recent Comments