नियामक मंडळ आणि संस्थेचे सदस्य यांच्या परस्पर सहकार्यातून संस्था विकास साधतात. , केंद्र सरकारने सहकारी संस्थांच्या माध्यमातून अनेक प्रकल्प जनतेपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली आहे.असे खासदार अण्णासाहेब जोल्ले म्हणाले .


चिक्कोडी तालुक्यातील कुंगटोली बहुउद्देशीय प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संस्थेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन व रजत महोत्सव सोहळ्याचे उद्घाटन करताना ते म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम सहकारी संस्था करतात. ते म्हणाले की, सहकारी संस्था मजबूत होण्यासाठी मिळालेल्या कर्जाची सुविधेची परतफेड करणे आवश्यक आहे.सदस्यांनी व ग्राहकांनी सहकारी संस्थेचा लाभ घेऊन आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हावे.
बीडीसीसी बँकेचे अध्यक्ष व माजी खासदार रमेश कत्ती म्हणाले की, बीडीसीसी बँकेच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना लोकांपर्यंत पोहोचवल्या आहेत. मात्र सरकारी योजनांचा पुरेसा वापर करण्यात आपण अपयशी ठरत आहोत, असे ते म्हणाले.
बेळगाव जिल्ह्यातील 819 प्राथमिक कृषी सहकारी संस्थांपैकी 134 प्राथमिक कृषी सहकारी संस्थांना गोडावून बांधकामासाठी 1% व्याजदराने कर्ज देण्यात आले आहे. केवळ आर्थिक व्यवसाय न करता बहुउद्देशीय सहकारी संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देता येईल, असे ते म्हणाले.
शिवलिंगेश्वर स्वामीजींच्या दिव्य सानिध्यात झालेल्या या कार्यक्रमात आमदार दुर्योधन ऐहोळे यांनी आपले विचार व्यक्त केले .
हेस्कॉमचे माजी संचालक महेश भाटे, सुरेश बेल्लद , शरद कवठगीमठ, केएलईचे संचालक बसवराज पाटील, व्याख्याते महेश मदभावी , शिवराय कामटे, हसन सनदी, विजय कोठीवाले, महांतेश भाटे, व्ही.एस.मलिंगे, बी.एस.उथुरे, महावीर पाटील,ईरगौडा पाटील, मुख्याधिकारी राजेंद्र पाटील, माजी संचालक उपस्थित होते.


Recent Comments