Chikkodi

भीषण दुष्काळी परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांना देत नाही प्रतिसाद

Share

राज्यात भीषण दुष्काळ आहे.शेतकरी संकटात सापडला आहे.अशा परिस्थितीत सरकार शेतकर्यांना प्रतिसाद देत नाही ही उपरोधिक बाब आहे, अशी टीका माजी मंत्री अरविंद लिंबावळी यांनी राज्य सरकारवर केली.

चिक्कोडी तालुक्यातील नागरमुन्नोळी व चिंचणी गावातील पिकांच्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना, शासन दुष्काळाचा पुरेसा अभ्यास करत नाही.जिल्ह्याचे प्रभारी मंत्री व अधिकारी दुष्काळाची चौकशी करत नाहीत का?सध्या राज्य सरकारने दुष्काळ व्यवस्थापनासाठी 300 कोटी रुपये जाहीर केले आहेत. जिल्हाधिकार्यांच्या खात्यात 32 कोटी जमा असून शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळत नाही ही खेदाची बाब आहे.

यावेळी खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार दुर्योधन ऐहोळे, आमदार हनुमंत निराणी, प्रदेश भाजप रयत मोर्चा उपाध्यक्ष दुंडाप्पा बेंडवाडे , माजी आमदार पी.राजीव, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश नेर्ली, महेश भाटे, सतीश अप्पाजीगोळ , संजय गौडा पाटील, सुरेश बेल्लद , रायगौडा केलगीनमनी , रमेश कलन्नवर, मनोज मनगुळी आदी उपस्थित होते.

Tags: