हुक्केरी तालुका भक्त कनकदास उत्सव समितीच्या वतीने कर्नाटक राज्य मेंढपाळ संघाचे उपाध्यक्ष म्हणून काम केलेले शंकर हेगडे यांचा सत्कार करण्यात आला.

भक्त कनकदास यांची जयंती साजरी करण्यासाठी हुक्केरी पर्यटन मंदिर येथे प्राथमिक बैठक बोलावण्यात आली होती. येत्या 30 नोव्हेंबर रोजी होणारी भक्त कनकदास यांची जयंती भव्य प्रमाणात साजरी करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. त्यादिवशी आडवी सिद्धेश्वर मठापासून भक्त कनकदास यांच्या प्रतिमेची भव्य सवाद्य मिरवणूक तालुका पंचायतीपर्यंत काढण्याचे ठरविण्यात आले. मिरवणुकीनंतर जाहीर कार्यक्रम होणार आहे.
यावर्षी कनक जयंतीला पाच जणांना कनक सद्भावना पुरस्कार देण्याचे ठरवण्यात आले. त्याचप्रमाणे 2022-23 च्या एसएसएलसी आणि पीयूसी परीक्षेत 90% पेक्षा जास्त गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
यावेळी हुक्केरी तालुका कुरबर संघाचे उपाध्यक्ष सिद्धप्पा एग्गन्नावर, ऍड. हालट्टी, सचिन हेगडे, अशोक डुमन्नावर, हालप्पा मरडी, महादेव मरडी, दुंडप्पा मेक्कळकी, बिरू कुबनगोळ, हालप्पा कुडबाळप्पागोळ, लक्ष्मण हेगडे व हालुमत समाजाचे नेते उपस्थित होते.


Recent Comments