चिक्कोडी वाहतूक पोलिस ठाण्याच्या पीएसआय रुपाली गुडोदगी यांनी ट्रॅक्टर चालकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत.

चिक्कोडी तालुक्यातील जैनापुर गावातील अरिहंत साखर कारखान्याच्या आवारात ऊस वाहतूक करणाऱ्यांसाठी वाहतूक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
ट्रॅक्टर चालकांना परवाना, विमा व नोंदणी सक्तीची असावी.ट्रॅक्टरवरील टेपचा आवाज मोठ्याने वाजवू नये.ऊसाचा जास्त भार जास्त नसावा,ट्रॅक्टर शहरांमध्ये संथ गतीने चालवावेत व मागे रेडियम रिफ्लेक्टर बसवावेत. रात्रीच्या वेळी ट्रॅक्टरचे जास्त अपघात होत असल्याने पीएसआय रुपाली गुडोदगी ट्रॅक्टर चालक यांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास थेट दंड आकारण्यात येईल, असा इशारा दिला. यावेळी फिरते पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आदी उपस्थित होते.


Recent Comments