चिक्कोडी तालुक्यातील चिंचणी गावात अल्लम प्रभू सिद्द संस्थान मठाच्या नेतृत्वाखाली कन्नड भवनात दि. 2 रोजी सकाळी 10 वाजता कर्नाटक राज्योत्सव व ग्रंथ लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे चिंचणी सिद्ध संस्थान मठाचे अल्लम प्रभू स्वामीजी यांनी सांगितले.

सिद्धसंस्थान मठात पत्रकार परिषदेत बोलत होते. विधान परिषद सदस्य व सरकारचे दिल्लीचे विशेष प्रतिनिधी प्रकाश हुक्केरी या कार्यक्रमाचे उद्घाटन करतील, तर चिक्कोडी सदलगाचे आमदार गणेश हुक्केरी हे पुस्तक प्रकाशन करतील. पद्मश्री पुरस्कार विजेते बी मंजम्मा जोगती प्रमुख पाहुण्या असतील.
साहित्य एल.एस. आठरी लिखित “कन्नड मराठी स्नेहसेतू कृ. शि. हेगडे” या ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ.दयानंद नूली, ग्रंथ दासोही, हिरेमल्लूर ईश्वरन महाविद्यालयाचे प्राचार्य, धारवाड शशिधर तोडकर, चिंचणी ग्राम समितीचे अध्यक्ष लक्ष्मण डांगेर आदींचे आगमन होणार असल्याचे सिद्ध संस्थान मठ, चिंचणीचे अल्लम प्रभू स्वामीजी यांनी सांगितले.


Recent Comments